Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन याठिकाणी “कृती प्रकृती कला प्रदर्शन”चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शत्रुघ्न काटे यांनी या प्रदर्शनात लहान मुलांनी काढलेल्या विविध अश्या अतिशय सुंदर आणि मनमोहक पेंटिंगचे भरपूर कौतुक केले आणि त्या लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा म्हणून केलेल्या या प्रयत्नांसाठी आयोजकांचे देखील आभार व्यक्त केले.
आपली कला जगासमोर मांडण्याची उर्मी असलेल्या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी “कृती प्रकृती कला प्रदर्शन”च्या माध्यमातून या पुढाकार घेतला.

असे कला प्रदर्शन कलाकारांना त्यांच्या कामाची ओळख करून देण्याची आणि प्रसिद्धी मिळवण्याची संधी देते. या प्रदर्शनातून मुलांना विविध कला प्रकार आणि कलाकारांच्या कामाची ओळख होते, ज्यामुळे त्यांची कलात्मक दृष्टी विकसित होते. कला प्रदर्शन कलाकारांमध्ये स्पर्धा वाढवते.
या स्पर्धेमुळे कलाकारांना आपले काम सुधारण्यासाठी आणि नवीन कला प्रकार शिकण्यासाठी प्रेरणा मिळते तसेच कला प्रदर्शनात अनेकदा कलाकारांना त्यांच्या कलाकृती आणि उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळते. यामुळे कलाकारांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारते असे मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, संदीप काटे, कोची आर्ट क्लास शिक्षक उमेश शिरसाठ,श्रीमती सुनीता माळी शंभवी रोशन करवी, संकेत वाधे, लिनिअर गार्डन जेष्ठ नागरिक संघ सदस्य,सागर बिरारी, पालक आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version