Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील पार्श्वनाथ सोसायटी मधील प्यारीबाई पगारिया सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहामधील शुभारंभाचा कार्यक्रम ” धार्मिक प्रार्थना आणि अनुष्ठान “भक्तामर पठण” अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुषांनी श्वेत पोशाख आणि महिलांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर ,धार्मिक आणि मंगलमय वातावरणामध्ये पार पडला .यावेळी प्रामुख्याने विविध संघाचे अध्यक्ष ,पदाधिकारी तसेच भाविक उपस्थित होते .या सर्वांनी भक्तामर पठनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन कासारवाडी जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी अहिंसा सप्ताह मधील कार्यक्रमांची माहिती दिली.

कार्याध्यक्ष विजय भिलवडे, महामंत्री संदीप फुलफगर, कोषाध्यक्ष नेनसूख मांडोत तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, माजी अजित पाटील , नितीन बेदमुथा विलासकुमार पगारिया ,सूर्यकांत मुथियान, वीरेंद्र जैन उमेश पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते,या वेळी कासारवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, प्रशांत बाफना आणि पार्श्वनाथ युवक मंडळाचे , किरण भंडारी यांचा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पेश पगारिया,स्नेहल भंडारी, गौरव बोरा , आदिंनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version