Spread the love

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागा ची औद्योगिक क्षेत्रभेट कोहिनूर हळद कंपनी व मॅप्रो गार्डन येथे नुकतीच संपन्न झाली. तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांना ज्यादा उपक्रमाच्या अंतर्गत ही क्षेत्रभेट घडवून आणण्यात आली. महाविद्यालयातील तृतीय वर्षातील जवळपास ९० विद्यार्थी व शिक्षकांसह सर्वजण सकाळी सातच्या सुमारास रवाना झाले. पहिली क्षेत्रभेट वाई येथील कोहिनूर हळद कारखाना येथे झाली.

शेतकऱ्यांकडून कच्चा स्वरूपातील हळद खरेदी करून त्यावर प्रक्रियांद्वारे चार वेगवेगळ्या प्रतीच्या हळद पावडर येथे तयार करण्यात येतात अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. जगातील एकूण हळदीचा 72% हळद एकट्या भारतामध्ये उत्पादित होते. त्यापैकी 52% हळदीचे उत्पादन महाराष्ट्र हे राज्य करतं अशी महाराष्ट्राच्या बाबतीत गौरवास्पद माहिती विद्यार्थ्यांना तेथील कर्मचारी व व्यवस्थापकांनी दिली. दुसरी क्षेत्रभेट मॅप्रो गार्डन शेंदुर्जने येथे झाली . स्ट्रॉबेरी पासून तसेच इतर फळांपासून वनस्पतींपासून येथे अनेक उत्पादने तयार केली जातात येथे विद्यार्थ्यांनी अनेक उत्पादनांच्या नमुने ज्यामध्ये अनेक प्रकारचे ज्यूस व जेलीचा आस्वाद घेतला. तसेच येथील उत्पादन प्रक्रिया तसेच विविध उत्पादनांची निर्यात अशा अनेक संकल्पना समजून घेतल्या. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रमांचा देखील आनंद घेतला ज्यामध्ये बर्फाच्छादित हॉलमध्ये बर्फाळ प्रदेशातील आनंद घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अनेक उत्पादने विद्यार्थी व शिक्षकांनी देखील खरेदी केली. क्षेत्राभेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्रचार्य डॉ. एच बी सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख डॉ. पद्मावती इंगोले यांचे सहकार्य लाभले. डॉ सुधीर बोराटे, डॉ. अर्चना माळी, डॉ. रामदास लाड, डॉ. शुभांगी भालेकर व प्रा. विक्रांत शेळके यांनी नियोजन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version