Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वेद स्पर्श क्लिनिक व वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने देशाचे शूर वीर असे भगत सिंह,राजगुरू,सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. 23 मार्च शहीद दिवस या दिवशी या देशाचे शूर वीर असे भगत सिंह,राजगुरू,सुखदेव,हे तीन सुपुत्र देशासाठी शहीद झाले
या तीन शहिदांना हा देश ,जनता कधीही विसरणार नाही व त्यांची प्रेरणा घेऊन अनेक जन आज देशप्रेमाची व्याख्या समजून घेतात.

वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या वीर देशपुत्रांना पुष्प वाहून विनम्र आभिवादन केले.डॉ. गीतांजली क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर वूई टुगेदर सचिव,आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे यांनी या वीर जवानाविषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.

या वीर पुत्रांचा इतिहास मंगला डोळे – सपकाळे यांनी खूप छान रित्या सांगितला या वेळी इन्कलाब जिंदाबाद!!भारत माता की जय! अशा घोषणा देण्यात आल्या.
या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सलीम सय्यद,सचिव,जयंत कुकलर्णी, खजिनदार,दिलीप चक्रे,मंगला डोळे – सपकाळे, दिलीप पेटकर,रवींद्र काळे,शंकर कुलकर्णी, रवींद्र सागडे, अरविंद पाटील,वेदस्पर्षचे, डॉ.गीतांजली क्षीरसागर, समीर दरेकर,संतोष भवर, प्रतीक्षा इंगळे,मोनाली खांडेकर,हेमलता सुतार, अनिता मुंडे, आदी पदाधिकारी,सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version