Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे, ज्योतीबानगर, सोनवणेवस्ती, शेलारवस्ती या औद्योगिक परिसरात महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामुळे लघुउद्योजक झाले त्रस्त झाले आहेत.महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने ताबडतोब वरील औद्योगिक परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी लघुउद्योजकांनी केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,तळवडे, ज्योतीबानगर, सोनवणेवस्ती, शेलारवस्ती या औद्योगिक परिसरात गेल्या आठ दिवसापासून महावितरण मार्फत करण्यात येत असलेला वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे उद्योजकांचे अतोनात नुकसान होत आहे. सध्या मार्च महिन्याची वर्क ऑर्डर पूर्ण करण्याची धावपळ चालू असताना दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे उद्योजक अक्षरक्ष: वैतागले आहेत. एखाद्या महिन्याचे वीज बिल भरण्यास उशीर झाल्यास महावितरण लगेच वीज कनेक्शन तोंडण्यास तयार असतात, परंतु गेले आठ दिवसांपासून सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजकाचे नुकसानीची भरपाई महावितरण करणार का ? असे उद्योजकांचे बोलण्यातून सवाल येत आहेत.

तरी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने ताबडतोब वरील औद्योगिक परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत व लघुउद्योजकांचे होणारे नुकसान कमी करण्यास सहकार्य करावे अशी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची विनंती आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version