Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना रहाटणी काळेवाडी आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त काळेवाडी परिसरातील महानगर पालिकेच्या २५ महिला आरोग्य सफाई कर्मचारी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सर्व महिलांना दुपट्टा देऊन यथोचित असा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योग गुरु सुरेश विटकर, सुजाता हरेश आबा नखाते, तसलीम शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी दत्तात्रय भट, एकनाथ मंजाळ, एकनाथ काटे, लक्ष्मण टोणपे, शंकर जाधव, मनपाच्या आरोग्य अधिकारी आत्माराम फडतरे, कृष्णा येळवे, बाळासाहेब येडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version