Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा येत्या ०९ ते १७ मार्च दरम्यान श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथा सुदवडी रोड येथे होणार आहे.

यनिमित्त आठवडाभर प्रतिदिन दोन कीर्तन सेवा पार पडणार आहेत. यामध्ये ०९ मार्च रोजी ह.भ.प. रवींद्र महाराज ढोरे व ह.भ.प. मुकुंद काका जाटदेवळेकर यांचे कीर्तन, १० मार्च रोजी ह.भ.प. सागर महाराज शिर्के, ह.भ.प. पोपट महाराज कासारखेडेकर यांचे कीर्तन, ११ मार्च रोजी ह.भ.प. दशरथ महाराज मानकर व ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन, १२ मार्च रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे व ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन, १३ मार्च रोजी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे व ह.भ.प. महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन, १४ मार्च रोजी ह.भ.प. नितीन महाराज काकडे व ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे कीर्तन, १५ मार्च रोजी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर व ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन, १६ मार्च रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम व ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन संपन्न होईल. ही कीर्तन सेवा सकाळी ११ वा. ते दुपारी १२. ३० वा. व सायंकाळी ०६ वा. ते ०८ वा. या वेळेत संपन्न होणार आहे तसेच १७ मार्च रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.

०८ मार्च रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन
०८ मार्च रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दरम्यान भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३७५ धर्मध्वजधारी, ३७५ कलशधारी, ३७५ तुळसीधारी, ३७५ कीर्तनकार, ३७५ टाळकरी, ३७५ मृदंग सेवा, ३७५ ब्रह्मविनाधारी, ३७५ चोपदार यांचा सहभाग असणार आहे. तसेच ह.भ.प. मारोतीबाबा कुऱ्हेकर यांचे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन संपन्न होणार आहे. याबरोबरच बीजोत्सवानिमित्त देहू, भंडारा डोंगर, घोरावेश्वर डोंगर, भामचंद्र डोंगरावर हेलिकॉप्टरने पुष्पपृष्ठी होणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version