Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय इंद्रायणीनगर ,भोसरी, पुणे .येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल शिक्षण विभाग आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे १७/०२/२०२५ ते २०/०२/२०२५ या कालावधीमध्ये आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ .अशोककुमार पगारिया यांच्या मार्गदर्शनाखाली केले .

दि.१७/०२/२०२५ रोजी प्रथम पुष्पासाठी डॉ. स्वाती गानू उपस्थित होत्या ,त्यांचा विषय “युवा स्पंदन” या विषयावर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले ,त्यात त्यांनी ‘व्यक्तिमत्व रंगावर नाही तर अंतरंगावर अवलंबून असते’ असा हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर १८/०२/२०२५ रोजी द्वितीय पुष्पासाठी डॉ. पांढरमीसे प्रकाश सर उपस्थित होते. त्यांचा विषय “मोबाईलच्या विख्यात आजची तरुणाई “या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मोबाईलवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा पुस्तकांशी मैत्री करा ‘वाचाल तर वाचाल’ असा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. २०/०२/२०२५ रोजी तृतीय पुष्पा साठी डॉ. पद्माकर पुंडे सर उपस्थित होते .त्यांचा विषय “चला गप्पा मारूया “या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी ‘संवाद कौशल्यावर’ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य कांबळे सदाशिव, बहि: शाल केंद्र कार्यवाह डॉ. स्वाती वाघ त्याचबरोबर नँक समन्वयक प्रा. म्हस्के प्रवीण, कला शाखाप्रमुख व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हनुमंत शिंदे मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय निकम , कार्यालयीन अध्यक्ष प्रा. भास्कर पांडुरंग , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. पवार सचिन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बैसाने सुधाकर, वाणिज्य विभाग प्रमुख विभा ब्राह्मणकर , प्रा. लांडगे उमेश ,प्रा. रोकडे प्रशांत,प्रा. महालक्ष्मी शिरसाट, प्रा. रेणू अग्रवाल, ग्रंथपाल प्रा. राजेश कुंभार ,गायत्री बेलेकर , सारिका बेलदोर , व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version