Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय,वाणिज्य विभागातर्फे व्यवस्थापन सप्ताहाचे आयोजन दिनांक ३ ते ७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित केला होता. या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी डॉ. अर्चना चिरमाडे यांचे “व्यवसाय व्यवस्थापनातील नवीन प्रवाह” या विषायावर व्याख्यान झाले.

कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवराय व माता रमाई यांना अभिवादन करून झाली. डॉ. अर्चना चिरमाडे यांनी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या कौशल्यावर आपले मत मांडले, यामधे व्यक्तिमत्त्व, संभाषण, निर्णय यासारखे कौशल्य आपण व्यावसायिकदृष्ट्या कशी वापरावीत यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमणच्या माध्यमातून विद्यार्थी कसे विकसित होतात यावर मार्गदर्शन करताना महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे सांगितली. सदर कार्यक्रम वाणिज्य विभागाच्या द्वितीय वर्ष, तुकडी – ई यांनी नियोजन केले. वाणिज्य विभागाचे डॉ. दिलीप कोतकर यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली. त्यांना डॉ. अर्चना माळी व प्रा. विक्रांत शेळके यांनी मदत केली. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. इंगोले, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे डॉ. माळी, प्रा. शेळके, डॉ. जगताप, डॉ. भालेकर, प्रा. ढमाले, प्रा. रोडे, प्रा. वटकर, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. नेत्रा लोहकरे, प्रा. सुशील गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी अपूर्वा जमादार, अतिथी परिचय सानिया अत्तार व आभार प्रदर्शन दिशा गोंधळी यांनी केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version