Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. रमाबाई यांच्या प्रतिमेस गीतांजली दुबे, स्वाती वक्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, शाळेच्या उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेतील शिक्षक अनिता रोडे, तृप्ती शर्मा, दिव्या सराफ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

“करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य महासूर्याची सावली, कोट्यावधींची माऊली, बाबासाहेबांची ऊर्जायनी, रामू, रमा, रमाई रंजल्या-गांजल्यांची दीन-दलितांची आई मातारमाई ह्यांनी अनेक हाल अपेष्टा, उपासमार सहन करून, कोणत्याही भौतिक सुखाचा हव्यास न धरता त्या अशिक्षित मातेने बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेले.

बाबासाहेबांची समाजाप्रती तळमळ पाहुन त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, ही जाणीव प्रत्येकामध्ये असली पाहिजे तसेच मातोश्री रमाबाईची सहनशीलता, सोज्वळता त्यागी व वात्सल्यवृत्ती, कष्ट, कामसू निर्मळपणा, स्वाभिमानी इ. गुणांचा आदर करून हे गुण आपल्या अंगी बाळगले पाहिजेत. त्याचप्रमाणे कठीण परीस्थितीवर मात करून कसे जीवन जगावे आणि फक्त जीवन जगणे नाही तर ते आनंदाने व समाधानाने कसे जगावे हा आर्दश घेतला पाहिजे.” असे अरुण चाबूकस्वार ह्यांनी म्हटले.

उर्मिला ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले व मोनिका भाजीभाकरे यांनी पाहुण्याचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version