Spread the love

 

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कुदळवाडी चिखली परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बस स्थानक उभारावे, अशी मागणी युवा नेते दिनेश यादव यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली गावातुन जाणाऱ्या बसेस सर्व मोईफाटा मार्ग पिपंरी चिचंवड या सर्व ठिकाणी जात असताना अनेक प्रवासी हे मोई फाटा येथे बस ची वाट पाहत असतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात यांचा मोठा त्रासविद्यार्थी, नागरिक, जेष्ठ नागरिक, पालक ,महिला यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे

सर्व नागरिकांनची मागणी आहे की मोई फाटा येथे बस स्थानक उभारवे , स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकास कामे होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या सर्व नागरिकांना च्या मागणी चा विचार करुन दिनेश यादव यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांना लेखी पत्र दिले

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version