Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलीटेक्निक मधील मुले आणि मुलींच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
    झील पॉलिटेक्निक, पुणे येथे झालेल्या मुले व मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धेत विजेत्या संघांना प्रो. निलेश कोकरे, प्राचार्य आयुब तांबोळी, समन्वयक प्रा. अमोल चांदारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक मुले, मुलींच्या स्पर्धेमध्ये झील पॉलिटेक्निक संघाने मिळवला.
     यशस्वी विद्यार्थी व संघ व्यवस्थापक प्रा. शिंदे जयश्री, मयुरी देशमुख, डॉ. एम. एस. पवार, संजय शिरोडे, क्रीडा समन्वयक सुनिल जगताप, प्राचार्या डॉ. विद्या बॅकोड यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version