Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पडली. आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी ९२ तक्रारी वजा सूचना मांडल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या जनसंवाद  सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १२, ९, २, १८, ३, ८, ८ आणि ९ अशा एकूण ६९ तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. महापालिकेच्या वतीने  जनसंवाद सभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिका-यांनी या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.

आज झालेल्या जनसंवाद सभेत फूटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे लवकरात लवकर पुर्ण करावीत, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे, तुटलेले चेंबर्सची झाकणे आणि खचलेले चेंबर्स दुरूस्त करण्यात यावेत, अनधिकृत पत्राशेड्सवर निष्कासणाची कारवाई करावी, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात यावी आदी सूचना नागरिकांनी मांडल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version