Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या बातमीचा इम्पेक्ट पिंपरीतील महात्मा फुले मैदानाची अवघ्या २४ तासात साफसफाई झाली.पिंपरी गाव पवनेश्वर मंदिर जवळील महात्मा फुले क्रीडांगणात घाणीचे साम्राज्य होते. पिंपरी गाव परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या या क्रीडांगणा रोज सकाळी – संध्याकाळी व्यायामासाठी , वॉकिंग साठी जेष्ठ नागरिक, तरुण सहकारी , खेळाडू येत असतात. या घाणीच्या साम्राज्यामुळे त्यांना खूप नाहक त्रास होत होता , तसेच संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी मद्यपींचा अड्डा बनलेला आहे.

महापालिका प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा तेथे कारवाई होत नाही. या ठिकाणी अक्षरशः रोज संध्याकाळी मद्यपींची मैफिल बसते. खूप मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक नागरिकांना व खेळाडू वर्गांना जेष्ठ नागरिकांना खूप भयानक त्रासाला सामोरे जावे लागत होते .महापालिका आरोग्य विभाग यांनी या ठिकाणी साफसफाई करून दिली. पोलिसांनी मद्यपीवर योग्य ती कारवाई करावी यासाठी पोलीस निरीक्षक पिंपरी यांना प्रत्यक्ष जागेवर बोलवून सत्य परिस्थिती दाखवणार आहे असे सुहास कुदळे यांनी सांगितले आहे. साफसफाई केल्याने नागरिकांची दुर्गंधीतून सुटका झाली व इतर होणाऱ्या नाहक त्रासातून नागरिकाचा बचाव होण्यासाठी मदत झाली.असे सुहास कुदळे यांनी सांगितले

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version