Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर येथील  (शनिवारी दि. ११) बासुरी बँक्वेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी आरोग्य विमा या आरोग्य योजने मार्फत देण्यात येत असते तसेच प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळेल.

आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेत (AB PM-JAY) आता ७० वर्षे वयोगटातील वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी १० दिवस आधी आणि आणि नंतरच्या खर्चाचा परतावा या योजने अंतर्गत मिळतो.

वृद्धांच्या आरोग्यासंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत आवश्यक आरोग्य विमा कवच प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी ही सोन्याची संधी असून या योजनेचा सर्व जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  शत्रुघ्न काटे यांनी केले आहे .यावेळी परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक संघातील तसेच सोसायटी मधील जेष्ठ नागरिक  उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version