Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस मार्गावरील पी. के
चौक येथे VUP अंडरपास पुल तयार करण्यात यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्ता कडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिकफाटा ते वाकड या बीआरटीएस मार्गावरील पी.के चौक येथे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्सेला सामोरे जावे लागत आहे,

यामार्गावर हिंजवडी, वाकड, पुणे येथे कामानिमित्त जाण्यासाठी हा सोपा मार्ग असल्याने नागरिक या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणत करीत असतात तसेच जवळच असणार्या भोसरी, चाकण, खेड औधोगिक परिसरातील मोठे माल वाहतूक करणारे वाहन देखील या मार्गार मोठ्या प्रमाणात वापर करीत असून तसेच या परिसरात नवीन बांधकाम  कंष्ट्रकशनचे काम देखील मोठ्या प्रमाणात चालू असून, त्यांची मोठे जडवाहने देखील या रस्त्यावर असल्याने त्यामुळे वारंवार या चौकात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे, या पी.केचौकातील वाहतूक कोंडीमुळे छोटे मोठे अपघात देखील या चौकात झाले आहेत.

पी. के चौकातील सततच्या होणार्या वाहतूक कोंडीचा त्रासून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस मार्गावरील पी.के चौक येथे VUP अंडरपास पुल तयार करण्यात यावा व नागरिकांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून
सुटका करण्यात यावी असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version