Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील महात्मा फुले वाड्यातील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष धम्मराज साळवे व पुणे शहराध्यक्ष रोहन मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पुणे शहराध्यक्ष रोहन मोहिते यांनी जयंतीनिमत्त शुभेच्छा देताना असे मत व्यक्त केले की, सावित्रीमाई यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर कार्य केले आणि त्यांच्या याच संघर्षामुळे आज अनेक महिला अनेक मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत त्यामुळे आजच्या महिलांनी सावित्रीमाईंच्या कार्याची जाण ठेऊन त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे.
यावेळी संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष धम्मराज साळवे ,महासचिव संतोष शिंदे,पुणे शहराध्यक्ष रोहन मोहिते, श्रीयश कदम, आकाश शिर्के, नागेश चव्हाण, ओंकार कसबे व इतर पदाधिकारी उपस्थित होते .

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version