Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अजमेरा ग्राउंड, स्केटिंग ग्राउंड, जीम, बॅडमिंटन हॉल वीज बिल न भरल्याने अनेक दिवसांपासून बंद आहे. लाखोंचे वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीज कट करण्यात आली असून, क्रीडा सुविधांपासून येथील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे, क्रीडा विभागाकडून सर्व सुविधा त्वरित सुरू करण्याची मागणी भाजपा सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे पत्रा निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेहरूनगर येथील मनपाचे जलतरण तलाव मागील आठवड्यापासून बंद असल्याने खेळाडू आणि नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, अतिक्रमण विभागाने अतिक्रमणाचे साहित्य याठिकाणी साठवून ठेवल्याने साठलेला कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकाराकडे आयुक्त शेखर सिंह यांनी वेळीच लक्ष देवून योग्य कार्यवाही करून संबंधित अधिकारी यांना सूचना द्याव्यात, असेही मंगोडेकर यांनी म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version