Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड मनपाच्या क्रीडा विभागातर्फे दिनांक ०२/१/२०२५ रोजी इंदिरा गांधी उद्यान दुर्गादेवी टेकडी निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शालेय चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन समारंभ श्री पंकज पाटील साहेब उपायुक्त (क्रीडा पिंपरी चिंचवड मनपा) यांचे शुभहस्ते व श्रीमती अनिता केदारी (क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा) यांची उपस्थिती संपन्न झाला.

इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन वयोगटात मुलां मुलींच्या स्वतंत्र घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत एकूण २०२७ विद्यार्थी व १४७ शाळांनी सहभाग नोंदविला. वयोगट क्रमांक १. पाचवी ते सातवी ( १) माझा आवडता खेळ(२) झाडे लावा झाडे जगवा(३) भारतीय सण तसेच. वयोगट गट क्रमांक २ आठवी ते दहावी..१) रक्तदान श्रेष्ठ दान २)प्रदूषण एक समस्या व उपाय३) भारतीय संस्कृतीतील विविधता असे नाविन्यपूर्ण व समाज उपयोगी विषय सदर स्पर्धेत देण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे कामकाज मा .श्रीमती अनिताताई केदारी (क्रीडा अधिकारी) पिंपरी चिंचवड मनपा यांचे नियंत्रणाखाली व श्री दीपक कन्हेरे स्पर्धा प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली श्री तिकोने गोरख, श्री अरुण कडूस, श्री अनिल जगताप, श्री बाळाराम शिंदे, श्री रंगराव कारंडे, श्री बन्सी आटवे, श्री दीपक जगताप इत्यादी पर्यवेक्षकांनी व श्री लक्ष्मण माने, श्री प्रशांत उबाळे ,श्री सोपान खोसे, श्री विजय लोंढे, श्री राजेंद्र सोनवणे ,श्री सुभाष जावीर, श्री अशोक शिंदे, श्री खैरे भाऊसाहेब, श्री पुनाजी पारधी, श्रीमती ऐश्वर्या साठे ,सौ वैशाली सांगळे, सौ सुनीता पालवे, सौ मंगल जाधव इत्यादी क्रीडा शिक्षकांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले.

सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्युत,उद्यान ,पाणीपुरवठा, पशुवैद्यकीय ,आरोग्य ,वैद्यकीय, पी.एम.पी.एम.एल वाहतूक विभाग इत्यादी विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री दीपक कन्हेरे स्पर्धा प्रमुख यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत , श्री हरिभाऊ साबळे व श्री सुभाष जावीर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती अनिताताई केदारी क्रीडा अधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले. पंडित भीमसेन जोशी संगीत अकॅडमीच्या कला शिक्षकांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले ‌.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version