Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जितेंद्र डुडी हे 2016 च्या बॅचचे सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. ते मूळचे जयपूरचे (राजस्थान) आहेत. त्यांची सुरुवातीला झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव म्हणूनही काम केले आहे.

2018 मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम केले आहे. ते सध्या सातारा येथे जिल्हाधिकारी पदी कार्यरत होते. त्यांच्या पत्नी पोलिस दलात आयपीएस अधिकारी आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version