पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली. रांगोळी, मेहंदी, काव्य वाचन, वक्तृत्व, पाककला अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांसाठी फनफेअर, फूड फेस्टिव्हलचे व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत होते यावेळी पालक सिमा सिंग, जया तळेकर, पुजा माने,पुजा साखरे, निर्मला सावंत, जसदू सुतार, शांती चौधरी, दिपाली जाधव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी विद्यार्थ्यांना येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी माहिती तसेच नाताळचे महत्त्व समजावून सांगितले. मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. सांता क्लॉजच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.या हृदय रोठे, आकृती तिवारी, सृष्टी साबळे, मंथन जाधव विद्यार्थ्यांनी शिक्षक रेणू राठी यांनी नाताळ सणाबद्दल माहिती सांगितली. येशूच्या गीतांवर गीतांजली दुबे यांनी गीत गायले. प्रज्ञा शिरोडकर, यांनी सूत्रसंचालन केले. पूजा देवगिरकर यांनी आभार मानले.
