Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाघोली येथील केसनंद फाट्यावरती पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले.या मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे.तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.ही घटना रात्री बार ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

वैभवी रितेश पवार ( वय १ वर्षे ), वैभव रितेश पवार (वय २ वर्षे),रीनेश नितेश पवार,(वय ३० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून ते बिगारी व मजुरी कामासाठी आले होते.जवळपास एकाच कुटुंबातील बारा जण फूटपाथवर झोपले होते.तर शंभर ते दीडशे जण फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते यामध्ये काही इतर राज्यातील आहेत तर काही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेले हाताला मिळेल ते काम करणारे सर्व मजुरी कामगार आहेत. वाहन चालक दारूच्या नशेत होता.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version