Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रीडा व युवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने अकोला येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल ची इशप्रित कटारिया या विद्यार्थिनी रोप्य पदक व भुसावळ येथे झालेल्या ऑल इंडिया बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कास्य पदक पटकवल्याबद्दल आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते इशप्रित कटारिया हिचा सत्कार करण्यात आलाआमदार शंकर जगताप यांनी तिच्या पुढील भावी वाटचाली करता शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले त्याप्रसंगी शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कांबळे ,प्रायमरीच्या मुख्याध्यापिका माया बायस वैशाली ढिसाळ ( समन्वयक ) ,शाळेचे इतर शिक्षक वर्ग व मुल मुली उपस्थित होत्या इशप्रित कटारिया हिला तिचे वडील जितू कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती पुढील वाटचाल करत आहे अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी दिली.

तिने यास्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल तसेच आतापर्यंत अनेक स्पर्धेमध्ये मेडल्स मिळवलेले आहे त्यामुळे तिच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे शाळेचे सेक्रेटरी राजेश मनाकांत यांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version