Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नेहरूनगर न्यायालयामधील सोसायटीचे शाखेकरीता ज्यादा सेवकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी पिं.चिं. ॲड. बार असोसिएशनतर्फे मा. अध्यक्ष अॅड. किरण एस.पवार व अन्य वकील बांधव यांनी माजी अध्यक्ष व दि पुणे लॉयर्स कन्झ्यु. को.ऑप सो. चे. तज्ञ संचालक ॲड. राजेश पुणेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेहरूनगर पिंपरी न्यायालयामधील वकील वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत असल्याचे देखील सांगितले.
नेहरूनगर पिंपरी न्यायालयामधील वकील हे दि पुणे लॉयर्स कन्झ्यु. को.ऑप सो. सभासद असुन नेहरूनगर पिंपरी न्यायालयामधे सोसायटीची शाखा आहे. सदर शाखेमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याचे वकील बांधवांनी सांगितले. सदर सोसायटीची शाखा वकील बांधवांचे सेवेसाठी चालू करणेत आली असुन सदर शाखेमधून वकील बांधव त्यांना रोजच्या कामाकरिता आवश्यक असणा-या वस्तू, कागद, तिकीट, स्टेशनरी, स्टॅम्प खरेदी करतात. परंतु अन्य नागरिक देखील स्टॅम्प खरेदी करीता गर्दी करत असल्याने व एकच कर्मचारी असल्याने वकील व अन्य नागरिक केली असुन यांचेमध्ये रोज वाद होत आहेत. सदर सोसायटीची शाखा वकिलांचे सेवेसाठी चालू वकील व अन्य नागरिक यांचेमधील वादावादीमुळे वकिलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नेहरूनगर पिंपरी न्यायालयामध्ये १७०० ते १८०० वकील काम करतात. त्यामुळे सोसायटीचे कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे. सदर अडचणी सोडविण्यासाठी व सोसायटीचे शाखेकरीता ज्यादा सेवक नेमेणेकरीता ॲड.राजेश पुणेकर यांचेकडे निवेदन देण्यात आले. अॅड. राजेश पुणेकर यांनी देखील सदर अडचणी लवकरात लवकर सोडविणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मा.अध्यक्ष अॅड. किरण एस. पवार, अॅड. योगेश थांबा, अॅड. अजित जाधव, सोसायटीचे कर्मचारी श्री. नाणेकर व अन्य वकील बांधव उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version