Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षनेते पदी  देवेंद्र फडणवीस साहेब यांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता हे स्पष्ठ झाले आहे कि उद्या गुरुवार दि 05/12/2024 रोजी मुंबई याठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि जनतेच्या मनातील महायुतीचे सरकार स्थापित होणार आहे .

विधिमंडळ पक्षनेते पदी निवड तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस  यांचा शपथ विधी बाबत पिंपरी चिंचवड भाजप शहर कार्यकारणी तसेच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून ते साजरा करण्यासाठीचिंचवड येथील चाफेकर चौक याठिकाणी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्तानी एकत्र येत जल्लोष साजरा केला. पिंपरी चिंचवड शहराच्या भरभराटी मध्ये तसेच विकासामध्ये आणखीन भर घालण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पुढाकार मोलाचा ठरणार असल्याची भावना आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे.

यावेळी भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकारी अध्यक्ष  शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके,  चंद्रकांत अण्णा नखाते, सचिन चिंचवडे, राजेंद्र गावडे,श्री बाबा त्रिभुवन,श्रीमती जयश्री गावडे,श्रीमती अश्विनी चिंचवडे, कैलास सानप, रवी देशपांडे, जयनाथ काटे, मधुकर बच्चे, अजित कुलथे,  रमेश काळे,, योगेश चिंचवडे, महेश कुलकर्णी, प्रभुणे काका, भूषण जोशी, प्रदीप सायकर, शालिग्राम, प्रमोद ताम्हणकर, काळुराम बारणे,  प्रशांत अगण्यान,श्री संजय भोसले, विठ्ठल भोईर तसेच भाजप आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version