Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी कार्तिक निवते याने बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल सीजन ३, २०२४-२५ या स्पर्धेत स्केटिंग प्रोफेशनल क्वाडस या क्रीडा प्रकारात अकरा वर्षाखालील वयोगटात उल्लेखनीय यश संपादन केले. कार्तिक निवते याने पुणे विभागात २०० मीटर मध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच ५०० व ८०० मीटर मध्ये कांस्यपदक मिळवून एकूण तीन पदकांची कमाई केली. त्याला क्रीडा शिक्षक महेश नलावडे, प्राचार्य डॉ. बिंदु सैनी, उपप्राचार्य पद्मावती बंडा यांचे मार्गदर्शन लाभले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्तिक निवते याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version