Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र विधानसभेत भाजपा महायुतीला दणदणीत विजय मिळवल्याबद्दल व चिंचवड विधानसभेत शंकर जगताप यांचा लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविल्याबद्दल चिंचवड येथील नगरसेवक सुरेश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालया बाहेर ढोल ताशाच्या जल्लोषात नागरिकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा साजरा करण्यात आला.

या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेविका कांता मोंढे, शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, शहर सचिव मधुकर बच्चे, रवींद्र प्रभुणे, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष दिपाली कलापुरे, प्रदीप सायकर, शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक नारायण लांडगे, तुकाराम चौधरी, सोनाताई गडदे, महेश बारसावडे, इंद्रायणी बँकेचे उपाध्यक्ष पोपटराव पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, ब्राम्हण महासंघाच्या उपाध्यक्षा सुषमा वैद्य, काकडे पार्क हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष माधव पाटील, पोलिस मित्र संघटनेचे सुभाष मालुसरे, सुरेखा जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version