Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरीमध्ये गुरूनानक जयंती निमित्त शिखसमाज बांधव आणि सिंधी समाज बांधव एकत्र येऊन गुरुनानक यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती.भजन कीर्तन करीत अनेक शिखबांधव आणि सिंधी समाज बांधव या मधे सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

लहान मुले आणि तरूण वर्ग मिरवणुकीच्या मार्गावर फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त करीत होते यावेळी पिंपरी येथील संत बाबा मुलसिंह दरबार अमृत व्हिला पिंपरी,संत कन्वर राम बुधा मंडली आदी गुरूद्वारा चे प्रमुख मुकेश फेरवानी, प्रदीप गरेजा, महेश नागरानी,गानो, भोलेनाथ राजा,अवी केवलानी गोपी आनंद संगत पिंपरी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पिंपरी येथील सिंधी समाजातील विविध संघटना आणि संस्थांचे पदाधिकारी मनोहर जेठवानी, अजित कंजवानी, हिरालाल रिझवानी,मनोज पंजाबी,गिताली असरानी आदी प्रमुख उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version