Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – पिंपळे सौदागर येथील हॉटेल गोविंद गार्डन बॅंकवेट हॉल याठिकाणी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन मार्फत जेष्ठ नागरिक मेळाव्याचे (दि.०९) आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी या मेळाव्याला सदिच्छा भेट देऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले की, जेष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे बॅक बोन आहेत. ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेत. ज्येष्ठ संस्कृती, समाज आणि कुटुंबाचे आधारस्तंभ असल्याने समाजाचे संतुलन टिकून आहे. प्रत्येकजण कधी तरी ‘ज्येष्ठ नागरिक’ होणारच आहे म्हणून आजपासूनच त्यांच्या आशा, अपेक्षा, समस्या आदीची जाणीव असणे गरजेचे आहे.

या कार्यकरांच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचे मिळालेले शुभाशीर्वाद हे शंकर पांडुरंग जगताप यांच्या विजयाची नांदी ठरणार आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
यावेळी जयनाथ काटे, भानूदास काटे पाटील, माजी नगरसेविका निर्मला कुटे, कुंदा भिसे, अरुण चाबुकस्वार, दीपक नागरगोजे, मनोज ब्राह्मणकर, जेष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर अध्यक्ष प्रकाश काळे, ऑल सिनिअर सिटीजन ग्रुप अध्यक्ष सुभाष पवार, लिनिअर गार्डन जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुरेश वाघळकर, नव चैतन्य हास्य क्लब अध्यक्षा शैला गुजलवार, आनंद हास्य क्लब अध्यक्ष जयस्वाल काका, कोकणे चौक जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष साळुंखे काका, वीर संभाजी महाराज जेष्ठ नागरिक संघाचे पुरुषोत्तम गाणार, विवेक फडणीस, पक्षाचे अनेक कार्यकर्ते तसेच पिंपळे सौदागर परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version