Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ”विद्यार्थी दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन कळसाईत यांनी मुलांना मार्गदर्शन केले, सहशिक्षक प्रज्ञा शिरोडकर, डिंपल काळे, हेमा सिंग यांनी विद्यार्थी दिनाचे महत्व सांगितले.
अरुण चाबुकस्वार सरांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना असे सांगितले, “७ नोव्हेंबर १९०० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी प्रतापसिंग हायस्कूल जि. सातारा इथे प्रवेश घेतला. तो हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांनी दिलेले ज्ञान स्वतः अंगीकारून धम्म क्रांती केली. उपेक्षितांना गावकुसावरून गावात आणले व हि क्रांती रक्त रंजित न करता बुद्धांच्या धर्मनिरपेक्ष,स्वातंत्र्य,न्याय ,समानता व बंधुभाव हि पंचसुत्रे देशाला दिली.” या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका स्वाती वक्टे यांनी केले कार्यक्रमाचे आभार मोनिका भाजीभाकरे यांनी केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version