Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक  २५/१०/२०२४       रोजी विहित वेळेत चौथ्या  दिवशी एकुण १४ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण २३ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे.

आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी  नोंदविलेल्या माहितीचा  तपशील :- सचिन मनोहर गायकवाड (राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार), मिना यादव खिल्लारे (महाराष्ट्र लहुजी सेना), भारती चंद्रकांत चांदणे ,  मंगाल भिकाराम कांबळे , स्वप्नील दादाराव कांबळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गट), भाऊ रामचंद्र अडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष), सुरेश मधुकर लोंढे , नरसिंग ईश्वरराव कटके, मनोज भास्कर गरबडे, श्री.अनिल श्रीपती सोनवणे, श्री.डॉ,सिद्धांत अनिल सोनवणे, श्रीमती.प्रफुल्ला शैलेंद्र मोतलिंग, श्री.जितेश सुरेश वाल्हेकर , डॉ.रामदास कुं.ताठे (पिपल्स रिपब्लीकन पार्टी कवाडे गट) यांनी एकुण २३ नामनिर्देशन अर्ज नेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. तसेच आज अखेर एकुण ७७ व्यक्तींनी एकुण १५३ नामनिर्देशन पत्रे विकत घेतली असुन एका उमेदवाराने एक नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आज अखेर २ नामनिर्देशन दाखल करणेत आले असल्याचे कळविले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version