Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवतेजनगर येथील स्वामी सेवा समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नंदिन सरीन प्रस्तुत “स्वर चांदण्यांचे” या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले आहे.

स्वामी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे हे मुख्य संयोजक आहेत. पिंपरी चिंचवड आयडॉल भूषण तोष्णीवाल, सूर नवा ध्यास नवा फेम अभयसिंह वाघचौरे, किशोरी सरीन, साहिल सारसर, किरण बेंद्रे, विजया चौहान हे गायन करणार आहेत. संगीतसाज नंदिन सरीन, प्रसाद कोठी, विनायक वाघचौरे, सतीश काळे यांचा आहे. प्रसिद्ध  निवेदक- व्याख्याते  राजेंद्र घावटे हे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version