Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भाजप महिला मोर्चा सरचिटणीस  वैशाली खाडये यांची उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे अलार्ड विद्यापीठ पुणे  विद्यापीठाच्या संचालक मंडळावर संचालक म्हणुन नियुक्ती करण्यात आली.

भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत.तीन टर्म युवामोर्चा सरचिटणीस एकदा युवती सरचिटणीस म्हणुन महाराष्ट्र प्रदेशावर अणि सध्या महिला मोर्चा पिंपरी चिंचवड शहरावर सरचिटणीस म्हणुन जबाबदारी आहे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वीकृत नगरसदस्य म्हणुन विविध सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,सांस्कृतिक अणि क्रीडाक्षेत्रात अणि महिलांसाठी त्या प्रभाविपणे काम करत आहेत,या निवडीने त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दसऱ्याच्या दिवशी मिळण्याने या संधी चे नक्कीच सोने करील असे त्या म्हणाल्या पक्ष श्रेष्ठिनी टाकलेला विश्वास आहे तर प्रामाणिक पणे काम करीन असे ही त्या म्हणाल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version