Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिवीर मित्र मंडळातर्फे आयोजित नवमी नवरात्र उत्सवनिमित्त आज शनिवारी भव्य रावणदहन, कपल दांडिया स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यावेळी उपस्थित असणार आहेत.

क्रांतिवीर मित्र मंडळातर्फे गेल्या 30 वर्षांपासून गणेश उत्सव व नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गरबा, दांडिया होतात. यंदाही महिलांसाठी दांडियासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने भेट दिली आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे हे देखील भेट देण्यात येणार आहेत. कपल डान्स, कपल दांडिया होणार आहेत. या नवरात्र उत्सवात विशेष करून महिलांची संख्या लक्षणीय असते भागातील प्रत्येक परिवारास मनासारखा आवडेल अशा प्रकारचे नियोजन व शिस्त बद्ध नवरात्र साजरा केला जातो

निगडी, यमुनानगर येथील ठाकरे मैदानावर 12ऑक्टोबर शनिवार सायंकाळी सहा वाजता भव्य रावणदहन, कपल दांडिया स्पर्धा होणार आहेत. कोणाला ग्रुप दांडिया किंवा सोलो डान्ससाठी सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी श्रीकांत सुतार यांच्याशी 9730228555 संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक व अध्यक्ष माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version