Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर योगेश योगेश बहल यांची आज निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे यांनी पक्षाचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून शहराध्यक्ष पद रिक्त होते. दरम्यान आज अजित पवार यांच्या उपस्थितीत योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. बहल यांच्या निवडीनंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वांनुमाते योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे

योगेश बहल हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत व अजितदादा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद भूषविलेले आहे. आगामी विधानसभा निवडणूक आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगेश बहल यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version