Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर आणि पिंपरी चिंचवड मधील नामांकित चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये दिनांक २ ऑक्टोबर रोजी लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी आणि संपूर्ण कर्मचारी वृंद यांनी स्वच्छता अभियान राबविले. संस्थेतील मुलांनी संपूर्ण शाळेतील कचरा एका जागी जमा केला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या अभियानासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.

संस्थेतील विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आणि संस्थेचा परिसर स्वच्छ करून एक उदाहरण स्थापित केले.

शाळेतील मुलांना सामाजिक जाणिवेची ओळख व्हावी या उद्देशाने संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री संदीप विठ्ठल काटे हे विविध सामाजिक कार्यक्रम संस्थे मध्ये राबवित असतात, या वेळी बोलताना श्री संदीप विठ्ठल काटे यांनी संस्थेतील मुलांना एक जवाबदार भारतीय नागरिक बनविण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले तसेच संस्थेतील मुलांना त्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे विचार सांगितले श्री संदीप काटे पुढे बोलताना विद्यार्थ्यांना प्लास्टिक चा कमीत कमी वापर करण्यास सांगितले जेणे करून पर्यावरणाची काळजी घेता येईल.

यावेळी संस्थेचे प्राचार्य  सुविधा महाले या हि उपस्थित होत्या. प्राचार्य सतत पर्यावरणाविषयी जागृती आणत असतात . मुलांना योग्य ते मार्गदर्शन सतत करत असतात. मुलांना गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री कळले पाहिजे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम शाळेत राबविला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version