Spread the love

 

युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना महात्मा गांधी लिखित चित्रे व चरित्र पुस्तक भेट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंती दिनानिमित्त शहर युवक काँग्रेसच्या वतीने भरविण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या जीवनावरील आणि स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनास विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सजी वर्की आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने काळेवाडीतील अलफोन्सा शाळेजवळ असलेल्या कोकण कारवार सभागृहात बुधवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सदर प्रदर्शन पार पडले.
यावेळी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष कैलास कदम, कार्याध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, माजी नगरसेवक बाबू नायर, मयूर जैस्वाल, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष शाहबुद्दीन शेख, जेष्ठ नेत्या बिंदू तिवारी, पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर, दक्षिण भारत विभाग अध्यक्ष जॉर्ज मॅथ्यू, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, उपाध्यक्ष अरुणा वानखेडे, रवी एन.पी., ॲड. करीम, राजन नायर, संदेश नवले, कुंदन कसबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मिडिया प्रभारी दिव्यांश गिरधर, प्रदेश सचिव अभिजीत अंकलकोटे, प्रदेश प्रवक्ते गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस वसीम शेख, जिफिन जॉन्सन, विनिता तिवारी, विक्रांत सानप, जिल्हा प्रवक्ते विशाल कसबे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनास भेट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास आयोजक चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने महात्मा गांधी यांनी लिहिलेले चित्रे व चरित्र हे पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांना महात्मा गांधी यांचे विचार असलेली प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version