Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेिडीयम स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेची उप मुख्याध्यापक सचिन कळसाईत, यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रज्ञा शिरोडकर, अनिता रोडे  यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच शाळा परिसराची स्वच्छता करून शाळा ते शिवार चौक परत शिवार चौक ते शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली.

यावेळी स्वच्छता मोहिमेचे बॅनर तसेच “झाडे लावा झाडे जगवा”, “स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर पिंपरी चिंचवड “, “साफ सफाई करूया आजार हटवूया”. “पुढील पिढीसाठी चांगली देणं माझा परिसर स्वच्छ ठेवेण” असे घोषवाक्य देऊन रहाटणी , पिंपळे सौदागर मध्ये स्वच्छता मोहिमेमार्फत जनजागृती करण्यात केली. यावेळी शाळेतील पाचवी ते दहावी विदयार्थी, शिक्षक रॅलीला उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी स्वच्छतेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शेन केले व प्रीती जोशी, मोनिका भाजीभाकरे, भावना देवरे, तृप्ती शर्मा या शिक्षकांनी महापुरुषांच्या कार्याबद्दलची माहिती दिली. तसेच सृष्टी साबळे, जीविका परचानी, मोहित गायकवाड, एंजल परिहार, मंथन जाधव, स्वराज प्रगणे या विद्यार्थ्यांनी महापुरुषांबद्दल भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू राठी यांनी केले व आभार हेमा सिंग यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version