Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ कासारवाडी येथील जैन स्थानकाच्या पगारिया सभागृहामध्ये ज्येष्ठ तपस्विनी श्रीमती गीता जैन यांच्या 71 दिवसाच्या प्रदीर्घ तपश्चर्येचा समारोप प्रत्याख्याध समारंभ मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी कासारवाडी जैन स्थानकामध्ये विराजित उपप्रवर्तिनी प पू मंगल प्रभाजी म सा, प पू डॉ मधुस्मिताजी म सा, प पू हर्षिताजी म सा, प पू दिव्यांशी श्री जी यांच्या मंगलमय सान्निध्यात संपन्न झाला. आणि प पू मंगल प्रभाजी यांच्या मुखारविंदाने हा प्रत्याख्यान करण्यात आले .

यावेळी तपस्वीनी श्रीमती गीता जैन यांना तपचंद्रिका या उपाधिने सन्मानित करण्यात आले व त्यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले. सुशील बहु मंडळ सदस्यांनी त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ नाटिका सादर केली तसेच अनेक मान्यवरांनी त्यांच्या दीर्घ तपस्येची अनुमोदना करून त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कासारवाडी श्री संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी सूत्रसंचालन केले .आणि  दिलीप भन्साळी , सागर सा़ंकला,  सुभाष ललवाणी,प्रा प्रकाश कटारिया, प्रा सुरेश धाडीवाल ,सौ पुष्पाताई कर्नावट, केवलचंद रांका, कविता रांका, डॉ अशोककुमार पंगारिया आदींनी तपस्वी भगिनीच्या तपस्येची अनुमोदना आणि अभिनंदन आपल्या भाषणातून केले.

यावेळी कासारवाडी, सांगवी ,दापोडी, पिंपळे गुरव तसेच भोसरी, आकुर्डी, चिंचवडगाव , पिंपळे सौदागर येथील संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि भाविक श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महासतीजीने आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून तपस्वी च्या तपश्चर्येचे अनुमोदना करून त्यांना शुभ आशीर्वाद दिले.

तपस्वींचा सन्मान श्री संघाच्या वतीने पंकज अशोक जी कांकरिया यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला आणि तपश्चर्येच्या माध्यमातून श्री सुनील कोठारी भाभी सौम्या रांका, भाई दिलीप रांका, पारसमंल लुंकड यांनी तपस्वी भगिनींचा सन्मान केला . सकल संघांच्या वतीने सुद्धा तपस्वी भगिनींचा सन्मान करण्यात आला.शेवटी मंगलपाठाच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version