Spread the love

खडकी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खडकी शिक्षण संस्था स्वर्गीय चंद्रकांतजी छाजेड शिक्षक गौरव समारंभ खडकी दिनांक 24/9/2024 रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खडकी परिसरातील 10 शाळेतील आदर्श शिक्षक शिक्षिका यांना या पुरस्काराच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल ( अध्यक्ष ख, शि, संस्था ) यांच्या हस्ते ट्रॉफी शाल व श्रीफळ देऊन खडकी भागातील आदर्श शिक्षक शिक्षिका यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ऑल सेट्स हाय स्कूल खडकी स्कूल च्या सुजाता साळवे यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरवण्यात आले.

याप्रसंगी (प्राचार्य) डॉ संजय चाकणे , प्रा घाडगे  (प्राचार्य) , डॉ आहेर , (सी ई ओ ) डॉ प्रसाद , श्री भूपेश , श्री रमित , डॉ वसंत ,  आनंद छाजेड आदी  उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ वैशाली वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब थोरात यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version