Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. यापार्श्वभूमीवर  पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील शाळा आणि कॉलेजेसना गुरुवारी (२६ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पिंपरी चिंचवड व पुण्यात बुधवारी दुपारनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली. तीन तास झालेल्या या पावसानं पुण्याची अक्षरशः वाट लावली. ठिकठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं नागरिकांना यातून मार्ग काढणं अवघड बनलं होतं. तसंच दुपारपासूनच रात्री उशीरापर्यंत बाणेर रोड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. आज देखील रेड अलर्टमुळं हीच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version