Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा दि 20/9/24 ते 21/9/2024 कृष्णा नगर चिखली पुणे येथे पार पडल्या यामध्ये
विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले व त्यांची विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता निवड झाली

*17 वर्ष मुली एअर पिस्टोल* प्रकार
1)) रितिका आहेर… द्वितीय क्रमांक

*19 वर्ष मुले ओपन साईट एअर रायफल*

1) संजीत ढगे… प्रथम
2) सार्थक थोरात.. द्वितीय
3) सारंग पाटील..तुतीय

*19 वर्ष मुली ओपन साईट प्रकार*
1) कु प्रणाली गुंजोटे… द्वितीय

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष  जगदीश  जाधव, सचिव  संजय जाधव, संचालक  विजय जाधव, संचालक   अमित बच्छाव यांनी  अभिनंदन केले.

तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  बाळाराम पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  साहेबराव देवरे पर्यवेक्षक दत्तात्रेय भालेराव क्रीडा शिक्षक शब्बीर मोमीन उप मुख्याध्यापिका सुषमा संधान कोर कमिटी सदस्य छाया ओव्हाळ,मनीषा जाधव, अमोल पाटील, सपना सावेडकर , आजिनाथ गुराळकर, अनिल मुंडे आदीनी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version