Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव या ठिकाणी आज आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेत इशप्रित कटारिया या विद्यार्थिनी सुवर्णपदक पटकावल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

पुणे युथ कप फुटबॉल 2024 या स्पर्धेत वयोगट 17 वर्षाखालील मुले या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तृतीय चॅम्पियनशिप मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले सामाजिक कार्यकर्ते सदस्य  संजय गांधी निराधार योजना ( महाराष्ट्र शासन ) संजय मराठे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.तसेच  कृष्णा भंडलकर अधिसभा सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रदीप रणदिवे बॉक्सिंग कोच जितू कटारिया शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी सेक्रेटरी राजेश मनाकांत मुख्याध्यापिका सीमा कांबळे प्रायमरी मुख्याध्यापिका माया बायस समन्वयक वैशाली दिंडाळ आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version