Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आवास योजना २.०  अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुवनेश्वरओडिसा येथे आज प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात आलेल्या  देशातील ४ लाख सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने च-होली येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांची ताबा पावती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर आणि आमदार उमा खापरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना देण्यात आली .

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपआयुक्त आण्णा बोदडेविशेष अधिकारी किरण गायकवाडसह शहर  अभियंता काळे, कार्यकारी अभियंता अनघा  पाठकमाहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे उज्वला गोडसेजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी भुवनेश्वर येथील सदनिका हस्तांतरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात सुरू होते.  देशातील ३० लाख कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  च-होली  घरे उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी २६ लाख घरे ही ग्रामीण भागात देण्यात आली आहेत  तर ४ लाख घरे ही शहरी भागात कुटुंबांना वाटप करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

दरम्यान  महापालिकेच्या वतीने भारतीदेवी विजय चव्हाणसखाराम नामदेव केंगलेललिता रामानंद मठपतीअनंत नथुराम भोसतेकररेणू रामलाल प्रजापतीशितल खुशाल शेटेसुजित अशोक बैंगीरेजीवन नारायण डेंगळेमीना अंकुश डामसेसिमरन फैयाज तांबोळीयोगिता ढाकरे या लाभार्थ्यांना येथील सदनिकांची ताबा पावती देण्यात आली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version