Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे उपलब्ध होते. पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेले पक्षाचे सरचिटणीस सचिन गायकवाड यांनी पक्ष उमेदवारी अर्ज पक्षाच्या पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे जमा केला आहे.

सचिन गायकवाड यांचा पिंपरी विधानसभेतील सामाजिक कार्यात हिरारीने पुढाकार असतो. त्यांचा मोठा जनसंपर्क तसेच मित्रपरिवार या मतदारसंघात आहे. सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळे जनतेच्या प्रश्नांची जाण त्यांना चांगल्या प्रकारे आहे. म्हणूनच पिंपरी विधानसभेतून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच विजय होईल असा विश्वास सचिन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, देवेंद्र तायडे, मयूर जाधव हे तीव्र इच्छुक आहेत. आता सचिन गायकवाड यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितल्यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version