Spread the love

 

कासारवाडी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – श्रीवर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ कासारवाडी यांच्या वतीने तपस्वींचा यथोचित सन्मान समारोह संपन्न झाला.

चंद्रकला तप करणारे 40 बालक तपस्वी आणि 48उपवास आज ज्यांना आहे त्या गीता जैन तसेच आयंबिल चे मासखमान तपस्वी मंगला पगारिया, एकासण्याची दीर्घ तपस्या करणाऱ्या सुशीला भंडारी, छाया भंडारी आणि शारदा भंडारी यांचा कासारवाडी मधील नमिनाथ जैन मंदिरापासून जैन स्थानकापर्यंत शोभायात्रा मिरवणुकीच्या माध्यमातून ” पगारिया सभागृहा”मध्ये पर्यंत जय जयकाराच्या घोषात मिरवणूक  काढण्यात आली.

उपप्रवर्तिनी परमपूज्य मंगल प्रभाजी डॉ मधुस्मिताजी प पू हर्षिताजी आणि प पू दिव्यांशीश्रीजी यांच्या मंगलमय सानिध्यात तपस्वींचा यथोचित सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला यावेळी साध्वीजींनी तपस्वींचे अभिनंदन करून त्यांचे प्रत्याख्यान केले .या कार्यक्रमासाठी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रामुख्याने संघाचे पूर्व अध्यक्ष शांतीलाल जी फुलफगर डॉ. अशोककुमार पगारिया, वसंतलाल बोरा, विलास कुमार पगारिया, संदीप फुलफगर हे पूर्वअध्यक्ष आणि दिलीप भन्साळी,रमण शिंगवी,पारस लुंकड, सुनील कोठारी हे सहयोगी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, महामंत्री पंकज कांकरिया ,कोषाध्यक्ष संदीप कर्नावट, तसेच मयूर पगारिया, प्रशांत बाफना ,पंकज कटारिया स्नेहल भंडारी आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला शेवटी महासतीजींच्या मंगल पाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version