महिलांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील – सचिव चंद्रशेखर जाधव
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- महिलांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त कला गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयोजक युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांनी दिली आहे.
या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील महिला सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेअंती प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते काढले जाणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ३,०००/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला २,०००/- रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक विजेत्याला १,०००/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गौरी गणपती सजावटीचे चार फोटो ७२१८८५१८८५ या क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवायचे आहेत. फोटोंच्या खाली स्पर्धकाचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेसाठी दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत फोटो आणि माहिती स्वीकारण्यात येणार असून या स्पर्धेत शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.
