Spread the love

 

पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – *हिंदू तत्त्वज्ञान श्रेष्ठ परंतु त्यांचे पालन न करण्यामुळे व जाती भेदभाव आचरणामुळे हिंदू धर्र्म कमजोर होत चालला आहे असे उद्गार विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी काढले.

विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठाव्दी पूर्ती कार्यक्रमा निमित्त सिंहगड, विठ्ठलवाडी पुणे येथील कार्यकमात आशिर्वचन भागवताचार्य किर्तन केसरी राजेंद्र महाराज यप्रे यांनी केले, राष्टीय स्वयंसेवक संघ नगर संघचालक संजय बापट, विहिप जिल्हा अध्यक्ष शरद जगताप, जिल्हा उपाध्यक्षा शुभदा गोडबोले, जिल्हा मंत्री साईनाथ कदम, प्रांत मंदिर अर्चक संम्पर्क सह सूर्यकांत थोरात, प्रखंड मंत्री सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असतांना या ६० वर्षांत विहिंप जगातील ३३ देशांमध्ये पोहचली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला जोडून काम करणे हा संघटनेचा उद्देश आहे. कारण, ही भावना जागृत करून ती आपल्या जीवनात अंमलात आणून संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन व्हावे, हाच उद्देश परिषदेचा आहे तसेच ६० वर्षातील सेवा कार्य, समरसतेचे कार्य, गोवंश रक्षण, गोआधारित शेती, संस्कांर आदिच्या कामांची माहिती यावेळी ॲड सतिश गोरडे यांनी दिली.
विश्व हिंदू परिषद स्थापनेत संताचा, धर्माचार्याचा मोठा सहभाग असून आपणही २००३ च्या कारसेवत सहभागी असल्याचे तसेच हिंदूंना संघटित होऊन जाती- जातीत होत असलेले वैमनस्य संपवावे लागेल असे प्रतिपादन भागवताचार्य राजेन्द जी महाराज यप्रे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन राजेन्द महाराज यप्रे यांचे हस्ते झाले कार्यकमाचे संयोजन आदिक सहस्त्रबुद्धे , वैभव थोपटे, रोहित लांडगे, अमन गालिम यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version