Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात क्रीडा दिवस साजरा केला जातो.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत साठे आणि इतर शाळेचे सहकारी शिक्षक वृंद जाधव चारुशीला , पांडुरंग घुगे , सुखदेव वीर , शशी चौधरी , कुणाली मॅडम, भागेश सर , इत्यादी उपस्थित होते. क्रीडा शिक्षकांनी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. व शाळेमध्ये वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले. लंगडी,फुटबॉल कबड्डी, लिंबू चमचा, रब्बी, वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

हा सर्व कार्यक्रम क्रीडा शिक्षिका पुनम देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version