Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष  पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष तुषार कामठे  ,वरिष्ठ_उपाध्यक्ष  धम्मराज_साळवे यांच्या नेतृत्वात एम आय एम पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, शहर उपाध्यक्ष हाफिज अबूबकर तसेच इतर कार्यकर्ते मनीषा वाघमारे,राज जेठीथोर,जितेंद्र वाघमारे ,मुफ्ती अब्दुल बासित, मौलाना अताहार,मालती बनसोडे,शोभा भिसे
ह्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
       महाराष्ट्रमध्ये वारंवार होणारे महिलांवरील अत्याचार,वाढती गुन्हेगारी,बेरोजगारी,महागाई असे अनेक समस्यांना सामोरे जायचे असेल तर आदरणीय पवार साहेबां शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.येणाऱ्या काळात प्रत्येक माणसामध्ये, घरा-घरा मध्ये पवार साहेबांचे विचार आम्ही पोहचवणार अश्या भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या..
यावेळी पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अल्ताफ  शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version